Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +9108048036867 (International callers) or 08048036867 (Indian callers).
रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ४ (भाग २)
ITP (Idio...
रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ४ (भाग २)
ITP (Idiolpathic Thrombocytopenic Purpura)
(आय.टी.पी अर्थात इडियोपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा )
सामान्यतः 'अकारण 'रक्तबिंबिकाल्पताजन्य रक्तस्त्राव ' (ITP) ही व्याधी कोणाला व किती प्रमाणात होऊ शकते?
दर लाख लहान मुलांमागे ४ मुलांना ही व्याधी दरवर्षी होते. ह्यात दोन गट करता येतील मोठी मुले व प्रौढ तरुण. मुलांपेक्षा मुलींत या व्याधीचे प्रमाण जास्त आहे.
'अकारण 'रक्तबिंबिकाल्पताजन्य' रक्तस्त्राव ' (ITP) चे निदान कसे केले जाते?
रुग्णाचा सांगोपांग पूर्वेतिहास जाणून व व्यवस्थित शारिरीक तपासणी करून आणि संपूर्ण रक्त गणन (CBC), काचपट्टीवर रक्ताच्या पातळ स्तराची सूक्ष्मदर्शीय तपासणी करून याचे निदान केले जाते. काही वेळा इतर तपासणींचीही गरज भासते. काही रुग्णांत अस्थीमगजाची तपासणी करून रक्तबिंबिका निर्मितीत अडथळा तर नाही त्यांचे निर्माण कार्य व्यवस्थित तर आहे ना? हे बघावे लागते व काही वेळा सदोष रक्तबिंबिका निर्मिती होते तसे तर नाही? याची खात्री करावी लागते.
'अकारण 'रक्तबिंबिकाल्पताजन्य' रक्तस्त्रावावर' (ITP) उपचार कोणते?
आपले रक्त व्याधी उपचारतज्ञ डॉक्टर ह्यावर (विशिष्ट उपचार करतात) वय, इतर शारिरीक आजार, व्याधीची तीव्रता, रुग्णाची निवड इ. गोष्टींचा विचार करून उपचार करतात. बऱ्याच लहान मुलांना अनेकदा कुठल्याही उपचाराची गरज लागत नाही त्यांना केवळ वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवायची गरज असते. यासाठी सुयोग्य उपचार आपले रक्तव्याधी उपचारतज्ञ डॉक्टरच ठरवतात.
उपचार पर्यायांत ---
१) स्टेरॉइड्स - यांनी योग्य परिणाम मिळाला तर रक्तबिंबिकांची संख्या वाढू लागते. ह्या औषधाचे काही सहदुष्परिणाम ही होतात. ज्यात चिडचिडेपणा, पोटात आग होणे, वजनात वाढ होणे, रक्तदाब वाढणे आणि चेहऱ्यावर पुळ्या येणे इ. दिसून येतात.
२. शिरेवाटे - गॅमाग्लोब्युलीनचे इंजेक्शन - हे एक प्रथिन असून यात अनेक प्रकारची प्रतिपिंडे (Antibodies) असतात व यामुळे रक्तबिंबिका मारल्या जाण्याचे प्रमाण कमी होते (व त्यांचे आयुर्मान वाढते) रक्तबिंबिका प्लीहेत मारल्या जातात ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे, या आजारात रक्तबिंबिका जगण्याचा कालावधी कमी होतो व रक्तबिंबिका लवकर (वेळेच्या आत) मारल्या जातात व त्यांच्या संखेत लक्षणीय घट होते. (जे ह्या इंजेक्शनने बऱ्याच प्रमाणात रोखले जाते.) ह्या इंजेक्शनचा प्रभाव स्टेरॉइड पेक्षा लवकर होतो (२४ ते ४८ तासांच्या आत). फक्त हे बरेच महाग आहे.
इतर पर्यायी उपचारांत : -
३) आर ए - इम्युन ग्लोब्यूलीन - ह्या औषधाने काही काळापुरते रक्तबिंबिका हननाचे (मारल्या जाणे) कार्य तात्पुरते थांबते. ह्यासाठी आपला रक्तगट पॉझिटीव्ह (+) असायला हवा आणि आपली प्लीहा असायला हवी. (काही रुग्णांत प्लीहा आधीच काढून टाकलेली असते अशावेळी या उपचाराची उपयुक्तता तेवढीशी प्रभावी होत नाही.)
४) प्लीहा निष्कासन शस्त्रक्रिया (प्लीहा काढून टाकणे) - (Splenectomy) :
काही रुग्णांत प्लीहा काढणे गरजेचे ठरते, कारण शरीराकडून (अस्थीमगजात) रक्तबिंबिकांची निर्मिती योग्य प्रमाणात होऊन देखील प्लीहेत त्या वेळेआधी (मारल्या गेल्याने) हनन झाल्याने त्यांची संख्या कमी होऊन रुग्णाच्या जीवनावर रक्तस्त्रावाची सतत टांगती तलवार असते अशावेळी 'प्लीहा निष्कासन शस्त्रक्रियेचा' निर्णय तज्ञ सुचवतात. हे बहुधा जुन्या 'अकारण 'रक्तबिंबिकाल्पताजन्य' रक्तस्त्रावांच्या' (ITP) रुग्णांत रक्तबिंबिका वाचाव्यात म्हणून तज्ञ सुचवतात.
५) इतर पर्यायी उपचारांत - अझॅथिओप्रिन, सायक्लोस्पोरीन, व्हीनक्रीस्टीन इ. औषधे जुनाट 'रक्तबिंबिकाल्पताजन्य' व्याधीत वापरली जातात.
६) रिटक्झीमॅब - हे एक एकांगीय प्रतिपिंड असून ह्याचाही वापर काही रुग्णांत केला जातो. हे महाग असून काही विशेष परिस्थितीत याचा वापर तज्ञ करतात. आपले रक्तव्याधीतज्ञ याबाबत विशेष माहिती देऊ शकतील.
महत्त्वाचा सल्ला :-
प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो त्याच्या करता विशिष्ट सल्ला योग्य वेळेला योग्य रुग्णाला तज्ञ देतात.
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कर्करोग तज्ञ )
Anemia
Bleeding Related Problem
Thrombophilia and Associated Problems
Acute Leukemia Treatment
Chronic Leukemia Treatments
Lymphoma Treatment
Myeloma Treatment
Haemophilia Treatment
Thrombocytopenia and Low Platelets Treatment
Dengue Fever Treatment
Pregnancy Related Hematological Problems
Clinical Laboratory Blood and Transfusion Problems
Pediatric and Neonatal Hematology Problems
Stem Cell Therapy
Bone Marrow Transplant
Thalassemia
Sickle Cell Anemia
Deep Vein Thrombosis
Pulmonary Embolism
Bone Maroow Test
Polycythaemia
Bone Marrow Transplantation
Haemophilia Care Centre
Acute Leukaemia
Medical Oncology
Haematology and Haemato Oncology
Bone Marrow Transplantation