रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १४ [भाग २ ]
थ्रॉम्बोफिलीया - (Thrombophilia)
(रक्त वाहिन्यांत आपोआप गुठळी होण्याची व्याधी )
‘थ्रॉम्बोफिलीया’ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी उपयुक्त माहिती
· कोणकोणत्या चाचण्या केल्या जाऊ शकतात?
यात विविध चाचण्या केल्या जावू शकतात आपले डॉक्टर किंवा थ्रोम्बोफिलीयाची काळजी घेणारे तज्ञ ते निश्चित करतात. काही तपासण्या रक्त गोठण्याच्या असतात व त्यांच्याद्वारे प्रत्यक्ष गोठण घटक मोजले जातात. इतर जनुकीय तपासण्याही काही जनुकीय व्याधी तर नाही ज्यात जनुकीय संकेतांकात (Genetic Code)बदल होतो व त्यामुळे डी.व्ही.टी. किंवा पी.ई. ची व्याधी होण्याची शक्यता वाढते. ह्या चाचण्याचे अहवाल गोपनीय असतात ते आपल्याला व आपल्या आरोग्य रक्षक चमुलाच( Health Care Team) माहित होतात
· 'थ्रोम्बोफिलीया' चे किती प्रकार आहेत?
'थ्रोम्बोफिलीया' चे अनेक प्रकार आहेत व त्यात नवनवीन शोधलेल्या प्रकारांची सातत्याने भर पडत असून मान्यता पावत आहेत. उदा. आपल्या रक्तभिसरणात विविध प्रकारचे नैसर्गिक गुठळी न होवू देणारे घटक असतात व ते गुठळी होवू नये म्हणून नियंत्रण ठेवतात. तीन हजारात एखाद्यात या नैसर्गिक गुठळी न होवू देणाऱ्या घटकाच्या खालावलेल्या पातळीने देखील डी.व्ही.टी. किंवा पी.ई. होण्याचा धोका वाढतो.
· यात मुख्य ३ प्रकार आहेत : -
Ø अँटीथ्रोम्बीन(Antithrombin)
Ø प्रथिन - सी (Protein-C)
Ø प्रथिन – एस (Protein-S)
व्यक्तीच्या जनुकीय संकेतांकात(Genetic Code) बदल होण्यास जनुकीय रचनांतर (Mutation) सामान्यतः कारण ठरते. नैसर्गिक( गुठळी न होवू देणाऱ्या घटकांची) कमतरता हे कारण नसते. काही जनुकीय रचनांतरे (Mutations) तीस जणांपैकी एकातच ( ३० :१ ) दिसून येतात व डी.व्ही.टी. व पी.ई. ची शक्यता नैसर्गिक घटकांच्या कमतरतेपेक्षा कमी असते.
Ø ह्या रचनांतरात दोन मुख्य घटक आहेत :-
पाचवा घटक (V) - लायडेन (Leiden)
प्रोथ्रोम्बीन जनुका रचनांतर यालाच दुसरा लायडेन घटक म्हणतात.
शेवटी, काही गोठण घटकांच्या वाढीने रक्त वाहिन्यांत गोठण्याचा धोका बळावतो. ह्या प्रकारच्या थ्रोम्बोफिलीयात गोठण घटक क्रमांकआठ (VIII) ची पातळी वाढलेली आढळते.
· मला 'थ्रोम्बोफिलीया' ची व्याधी असल्यास मी कोणती विशेष काळजी घ्यावी?
जी काळजी 'थ्रोम्बोफिलीया' नसलेल्या डी.व्ही.टी. किंवा पी.ई. ची व्याधी असणाऱ्यांनी घ्यायची आहे तीच काळजी 'थ्रोम्बोफिलीया' असणाऱ्यानीही घेण्याची गरज असते.
Ø वजन जास्त असेल तर - वजन कमी करायला हवे.
Ø आरोग्यदायी जीवन पद्धती(Healthy Lifestyle) स्वीकारावी व सुयोग्य आहार घ्यावा व नियमित व्यायाम करावा.
काही विशेष परिस्थितींत डी.व्ही.टी. व पी.ई. च्या व्याधींची शक्यता खूपच वाढते अशावेळी डॉक्टरांचा किंवा तुमच्या काळजीवाहू तज्ञांचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला रुग्णालयात भरती करण्यात आले अशावेळी सल्ला घेण्याआधी 'थ्रोम्बोफिलीया' असल्याची पूर्व कल्पना तुमची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जरूर द्यावी व मागे डी.व्ही.टी. किंवा पी.ई. ची व्याधी मागे कधी झाली होती त्याचा खुलासा करावा.
डी.व्ही.टी. किंवा पी.ई. ची व्याधी खालील गोष्टींमुळे पुन्हा उद्भवण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो यात :-
> शस्त्रक्रिया (फक्त मोठ्या शस्त्रक्रियांतच धोका असतो उदा. पोटाची पूर्ण भूल देवून केलेली शस्त्रक्रिया किंवा हाडांवर केलेली शस्त्रक्रिया अशा वेळी हिपॅरीनचे इंजेक्शन देवून धोका कमी करता येतो छोट्या दातांच्या शस्त्रक्रिया किंवा तपासणीसाठी तुकडा काढण्याच्या शस्त्रक्रिया(Biopsies),( ज्या स्थानिक भूल(Under Local Anaesthecia) देवून केल्या जातात त्यांच्यात खूप धोका नसतो.)
> प्रदीर्घ काळापर्यंत हालचाल नसणे किंवा हाड जुळण्यासाठी केलेले प्लास्टर.
> संप्रेरक बदलोपचार चा वापर (Harmone Replacement Therapy)
लक्षात ठेवावे, अशावेळी न विसरता सल्ला घ्यावा कारण यामुळे छोटीसी काळजी घेवून पुढे येणाऱ्या मोठ्या समस्या टाळल्या जावू शकतात.
· अशी कोणती लक्षणे व रोगाची चिन्हे असतात ज्यामुळे मला पुन्हा डी.व्ही.टी. किंवा पी.ई. व्याधी होईल असे दर्शवते ?
एकदा डी.व्ही.टी. ची व्याधी होवून गेल्यानंतर त्याठिकाणी सूज येणे किंवा दुखणे ह्या गोष्टी सामान्यतः असतातच. ह्याचे कारण नीलेतल्या झडपा खराब होतात व यालाच व्याधी उपरांत नीलादाह लक्षणांचा समूह (Post Phlebitic Syndrome) म्हणतात. दिवसाच्या शेवटी किंवा खूप वेळ उभे राहिल्यावर लक्षणांची तीव्रता वाढते, सकाळी बरे वाटते.
· यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता नवीन गुठळी तयार झाली टी कशी ओळखायची ?
म्हणूनच, जर तुम्हाला पुन्हा ही सूज, नव्याने खूप दुखणे असेल व रात्री विश्रांती घेवून देखील सूज व वेदना तशाच जाणवत असतील ज्या मध्यंतरी नव्हत्या व वाढत असतील तर अशावेळी तुम्ही आपल्या डॉक्टरांना भेटायला हवे. पी.ई. (Pulmonary Embolism) च्या लक्षणांत खूप जोराचे टोचल्यासारखे छातीत दुखणे विशेषतः हा त्रास श्वास घेतल्यावर व खोकल्यावर वाढतो हे लक्षण दिसून येते. खूप जोराचे टोचल्यासारखे तीव्र पण काही सेकंदापुरतेच छातीचे दुखणे या व्याधीत बऱ्याच लोकांमध्ये दिसून येते. तथापि तीव्र छातीतील दुखणे व ते तासाभरापेक्षा अधिककाळ असणे हे यात दिसून येत नाही त्यासाठी त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अनेक वेळा श्वास घ्यायला त्रास होणे पण छातीत न दुखणे हे पी. ई. या व्याधीचे प्रथम चिन्ह असू शकते. म्हणून जर तुम्हाला एखादी श्वासाची नवीन समस्या उद्भवली व ती स्थिर तशीच असली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
क्रमशः
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कॅन्सर तज्ञ)