Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +918048032699 (International callers) or 08048032699 (Indian callers).
रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ६ (भाग २) Leukemia ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) AML ची कारणे कोणती? असे मानले जाते की रक्त कर्क रोगाची सुरुवात एका विकृत पेशीपासून होते. पेशी निर्मितीचे कार्य काही महत्वपूर्ण जनुकांमार्फात (Genes) नियंत्रित केले जाते त्यामुळे पेशी विभाजन, वर्धन (संख्यात्मक वाढ व गुणात्मक वाढ) व आयुष्य हे सर्व ह्या जनुकांमार्फत नियंत्रित केले जाते परंतु जेव्हा ही जनुके (Genes) क्षतिग्रस्त होतात किंवा त्यांचे स्थानांतरण होते तेव्हा पासून विकृत पेशी निर्मितीस प्रारंभ होतो जर ही विकृत पेशी जगली / वाचली तर ती अशा अनेक विकृत पेशींच्या निर्मितीला कारण ठरते व अशा अनियंत्रित पेशी निर्मितीतून हा कर्करोग होतो. काही धोकेदायक घटक (जे वरील घटनेला जबाबदार ठरू शकतात) त्यांत प्रारणे (Radiation) / किरणोत्सर्ग - उदा. कुठल्यातरी वेगळ्या आजारासाठी जर आपण किरणोपचार (RadioTherapy) घेतला असेल तर AML होऊ शकतो. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जे अणुबॉम्ब हल्ल्यातून बचावले त्यांना अत्याधिक किरणांच्या संसर्गाने AML झाला. आधी घेतलेल्या रसायानोपचाराने (Chemotherapy) किंवा काही औषधांनी प्रतिकारक्षमता क्षीण झाली असेल तरी AML होवू शकतो. धुम्रपान - (बेंझीन नावाचे जे सिगारेट मध्ये असते ते अशा प्रकारच्या कर्करोगाचे AML कारण मानले जाते.) आपल्याला अस्थिमगजाचे काही वेगळेच आजार असतील तर अशा व्यक्तींना AML होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते यात:- AML ची मुख्य लक्षणे कोणती? अनियंत्रित विकृत पेशींच्या निर्मितीमुळे (Blasts) संपूर्ण अस्थिमगजाचा भाग ह्या पेशींनी व्यापला जातो त्यामुळे चांगल्या पेशींच्या निर्मितीत अडथळा येतो व चांगल्या (सामान्य) पेशींना जगायलाही अडचण होते एवढेच नव्हे तर या विकृत पेशींचा संचार रक्तप्रवाहात सुरु होतो. त्यामुळे काही मुख्य समस्यांचा उगम होतो. १) पंडुरोग (Anaemia) - तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीत अडथळा आल्याने कालांतराने ह्यांची संख्या रोडावते व त्यामुळे थकवा येणे, धाप लागणे आणि काही इतर ही लक्षणे दिसायला लागतात व अशी व्यक्ती पिंगट दिसू लागते. २) रक्तस्त्राव - ह्या आजाराच्या पेशींनी जागा व्यापल्याने अस्थिमगजात निर्माण होणाऱ्या इतर पेशी जसे रक्तबिंबिकांच्या निर्मितीतही अडथळा येतो व त्यामुळे त्यांची संख्या कमी झाल्याने गोठण क्षमता जावून थोड्याशा धक्क्याने ही रक्तवाहिन्या फुटून त्वचेखाली रक्त वाहू लागते. हिरड्यातूनही रक्तस्त्राव होवू लागतो व इतरही रक्तस्त्राव संबंधित समस्या उदभवतात. ३) गंभीर जंतुसंसर्ग - सर्वप्रकारच्या जीवनावश्यक पेशिनिर्मितीत अडथळा आल्याने शरीराला बाहेरच्या जन्तुपासून संरक्षण देणाऱ्या पांढऱ्या पेशी तरी अपवाद कशा राहणार? ह्या पेशींची संख्या खूपच कमी झाल्याने ह्या आजाराच्या व्यक्ती गंभीर आजारांना(Serious Infections) लगेच बळी पडतात. कोणत्या भागात जंतूंचा शिरकाव झाला आहे त्यानुसार लक्षणे दिसून येतात. ह्या विकृत पेशी काही वेळा इतरही ठिकाणी गोळा होतात त्यामुळे या रुग्णांत लसिका गाठींवरही(Lymphnodes) सूज दिसून येते, प्लीहा, यकृत यांचाही आकार वाढतो व इतर वेगळीही लक्षणे अशावेळी दिसू शकतात. इतर दिसून येणाऱ्या लक्षणांत सांधेदुखी, हाडदुखी, (Bone&Joint pain), सततचा ताप, वजनात घट ही आढळतात. या आजारावर वेळीच उपचार केला नाही तर काही महिन्यांतच ह्या रुग्णांचा मृत्यू होतो.
(AML) चे निदान कसे होते ? रक्तचाचणी: नेहमीची रक्त चाचणी (CBC) AML असल्याचे सूचित करते. ह्या तपासणीतून तांबड्या रक्त पेशींची घटलेली संख्या, पांढऱ्या व रक्तबिंबिकांची ही संख्या कमी झालेली दिसते. काही विकृत पेशीही ह्या तपासणीत दिसून येतात. काही वेळा मोठ्या प्रमाणातही या विकृत (कर्कग्रस्त) पेशी दिसतात. पुढील काही तपासण्या निदान निश्चितीसाठी (Correct diagnosis)करण्यासाठी केल्या जातात. अस्थिमगजनमुना (Bone Marrow Sample) ही चाचणी कमरेच्या हाडात सुई टोचण्याच्या जागी स्थानिक भूल देवून सुई टोचून अस्थिमगजाचा नमुना सिरींज ने बाहेर ओढला जातो. हा नमुना काचपट्टीवर घेवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघून विकृत पेशींचा शोध घेऊन निदान निश्चित केले जाते. पेशीव गुणसुत्रीय पृथक्करण (Cell&Chromosomal Analysis)- काही रोगाविषयी अधिक तपशील देणाऱ्या विकृत पेशींच्या चाचण्या ह्या अस्थिमगजातून मिळालेल्या नमुन्यातून केल्या जातात. यात गुणसूत्रातील विशिष्ट बदल तपासले जातात. गुणसूत्रे ही पेशिंचाच एक भाग असतात त्यात डी.एन.ए. असते यावर पेशीचा जनुकीय आराखडा अवलंबून असतो. AML या व्याधीचे बरेच उपप्रकार या पेशींतल्या गुणसूत्रात झालेल्या बदलावर ठरतात (हे बदल फक्त रक्तकर्करोगातच दिसून येतात. नेहमीच्या निरोगी पेशींत हे बदल दिसून येत नाहीत.) रुग्णाच्या उपचाराच्या व भवितव्याच्या(Prognosis) दृष्टीने AML च्या उपप्रकाराचा शोध घेणे आवश्यक ठरते. क्रमशः धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकारवकर्करोगतज्ञ)
Anemia
Bleeding Related Problem
Thrombophilia and Associated Problems
Acute Leukemia Treatment
Chronic Leukemia Treatments
Lymphoma Treatment
Myeloma Treatment
Haemophilia Treatment
Thrombocytopenia and Low Platelets Treatment
Dengue Fever Treatment
Pregnancy Related Hematological Problems
Clinical Laboratory Blood and Transfusion Problems
Pediatric and Neonatal Hematology Problems
Stem Cell Therapy
Bone Marrow Transplant
Thalassemia
Sickle Cell Anemia
Deep Vein Thrombosis
Pulmonary Embolism
Bone Maroow Test
Polycythaemia
Bone Marrow Transplantation
Haemophilia Care Centre
Acute Leukaemia
Medical Oncology
Haematology and Haemato Oncology
Bone Marrow Transplantation