Nashik
08048036867
+917774073485

रुग्णजागृती  ज्ञानमाला पुष्प – ७ (भाग १)          ...

                 रुग्णजागृती  ज्ञानमाला पुष्प – ७ (भाग १)
                           लिम्फोमा
(Lymphoma)
     

शरीरभर पसरणारा मोठ्या B लिंफोसाईट (पेशींचा)  कर्करोग   - वैद्यकीय शब्द -- लिम्फोमा (उपनाव DLBCL) - (Lymph node cancer)

लिम्फोमा म्हणजे काय?
हा एक लिम्फोसाईट (लसिकापेशी) चा कर्करोग असून ह्या सुद्धा पांढऱ्या पेशींत येतात ह्यांचा लसिका मार्गातून शरीरभर संचार होत असतो ज्यात अस्थिमगज प्लीहा, थायमस ग्रंथी (ह्या दोन्ही फुफ्फुसांच्या मधल्या भागात असतात) लसिका गाठी यांचा समावेश होतो. (लसिकापेशींच्या कर्कव्याधीस वैद्यकीय भाषेत लिम्फोमाअसे  म्हटले जाते)
लिम्फोमाचे दोन मुख्य प्रकार आहेत:-
अ. हॉजकिन्स लिम्फोमा (हॉजकिन लिम्फोमा ही म्हणतात)
ब. नॉन हॉजकिन्स लिम्फोमा
(NHL)
आता आपण ज्याची व्याप्ती सर्वाधिक आहे, ज्याचे भरपूर रुग्ण समाजात पाहायला मिळतात अशा Diffuse LargeB -cell Lymphoma (DLBCL) ची माहिती करून घेणार आहोत.   
(शरीरभर पसरणारी  B -लसिका पेशींची  कर्करोग ) हा अतिशय वेगाने पसरणारा, रौद्ररूप धारण करणार  नॉन हॉजकिन्स प्रकारातील कर्करोग आहे. याचे सुमारे २० पेक्षा अधिक प्रकार आहेत परंतु वर सांगितलेला प्रकार हा सर्वाधिक आढळून येतो. जवळपास सर्व लसिका ग्रंथीच्या कर्करोगात सुमारे ३०% एवढे या एकट्याचे प्रमाण आहे. जर यावर योग्यवेळी व योग्य उपचार केला गेला नाही तर मृत्यूचे कारण ठरतो. योग्य वेळी व निर्धारित कालमर्यादेपर्यंत यावर उपचार केला गेला तर सर्व रुग्णातले निम्मे रुग्ण पूर्ण बरे होतात.  

DLBCL कशामुळे होते?
वय, लिंग, कुळ आणि वंश यांच्यावर हा कर्करोग एखाद्या  व्यक्तीला  होईल कि नाही ते अवलंबून असते.  हा आजार( DLBCL)सर्व वयोगटांतल्या व्यक्तीत दिसून येत असला तरी मध्यमवयीन व वयस्करांत अधिक प्रमाणात  आढळतो. सरासरी ह्या आजाराच्या निदानाचे वय ६४ वर्षे आहे. स्रीयांपेक्षा पुरुषांत याचे प्रमाण थोडेसे जास्त असते.

याची लक्षणे कोणती?

या   कर्करोगा च्या रुग्णांत अचानक मानेत, जांघेत किंवा पोटात, छातीत गाठ दिसून येते व ती झपाट्याने वाढत जाते.पाचातल्या एका रुग्णात ही गाठ शक्यतोवर एकाच भागात असते. तथापि, सुमारे ४०% लोकांत या कर्करोगा चे निदान झाल्यावर ती लसिका मार्ग सोडून इतर जवळपासच्या अवयवांत पसरलेला आढळतो (NHL चे) निदान केले जाते तो पर्यंतहा लसिका (संस्था मार्ग) सोडून जवळपासच्या इतर अवयांपर्यंत पसरतो. काही रुग्णांत हा आजार अस्थिमगजातही पोहोचतो. (अस्थिमगजात सर्व प्रकारच्या रक्त पेशींची निर्मिती होते) यात रुग्णाला ताप येतो त्याचे वजन घटते, रात्रीचा घाम येतो. ह्या लक्षणांना B - लक्षणे ही संबोधतात व डॉक्टर लिम्फोमा असल्याचे संभाव्य निदान करतात. 

ह्याचे निदान केले जाते?
रक्तविकारतज्ञ मोठ्या गाठीतून तपासणीसाठी तुकडा(Biopsy) काढून DLBCL चे निदान पक्के करतात काही वेळा इतर अवयवांत पसरलेला असल्यास तेथील तुकडा तपासणीसाठी घेऊन निदान निश्चित करतात. तपासणीसाठी काढलेल्या तुकड्यातल्या उतींतून( Tissues) इतर अधिक तपशीलवार चाचण्या केल्या जातात त्यासाठी विविध तंत्र अवलंबले जातात जेणे करून विकृत पेशींचा प्रकार कळून येईल.  
निदान चाचण्या  - DLBCL च्या निदानासाठी अनेक चाचण्या उपलब्ध आहेत व त्याद्वारे शरीराच कुठला भाग ह्या आजाराने ग्रस्त आहे ते शोधून काढले जाते. ह्यात विविध तपासण्या / चाचण्या केल्या  जातात..    
* छातीचा, पोटाचा कमरेचा सीटी-स्कॅन
* रक्त तपासण्या
* अस्थिमगज तुकडा तपासणी (Bone Marrow Biopsy)(हाडाच्या आतल्या पोकळीतून जाळीदार भाग तपासणी साठी काढणे)
* पेट स्कॅन - ह्या तंत्रज्ञानांत एक किरणोत्सारीद्रव्य शिरेवाटे दिले जाते व हे द्रव्य कर्कग्रस्त पेशी शोषून घेतात व त्या विशिष्ट कॅमेऱ्याने पहिल्या जातात व निदान केले जाते.
 
 
                                                                         क्रमशः
धन्यवाद !               

डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – ( रक्तविकार कर्करोग तज्ञ )
 
 

 2021-05-27T13:05:43

Keywords