Nashik
08048036867
+917774073485

रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १४ [भाग १] थ्रॉम्बोफ...

रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १४ [भाग १] थ्रॉम्बोफिलीया - (Thrombophilia) (रक्त वाहिन्यांत आपोआप गुठळी होण्याची व्याधी ) ‘थ्रॉम्बोफिलीया’ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी उपयुक्त माहिती प्रस्तावना :- शरीरभर प्राणवायूच्या(Oxygen) पुरवठ्यासाठी व विविध रासायनिक क्रियेतून निर्माण झालेल्या टाकावू पदार्थांना काढण्यासाठी रक्त शरीरभर एकसारखे रक्त वाहिन्यांतून फिरत राहते. ह्यालाच रक्ताभिसरण ही म्हणतात (Blood Circulation). या रक्ताभिसरणा दरम्यान रक्त कुठे गोठले (गुठळी तयार झाली) तर त्याला ‘थ्रॉम्बोसिस’ म्हटले जाते. जेव्हा ही गुठळी खोलवर नीलेत (अशुद्ध रक्त वाहिनी) असते त्यावेळी ह्या व्याधीला डी.व्ही.टी. (Deep Vein Thrombosis) अर्थात 'खोलवरच्या नीलेतील गुठळी ची व्याधी म्हटले जाते. जेव्हा खोलवर नीलेत अशी गुठळी तयार होते तेव्हा ही गुठळी तुटून एखादा तुकडा रक्तप्रवाहासोबत फुफ्फुसापर्यंत पोहोचतो व तो हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिनीत (रोहिणीत) अडकतो त्याला पी .ई. (Pulmonary Embolism) अर्थात फुफ्फुस रोहीणीतील गुठळी असे संबोधतात. काहीवेळा त्वचेखालील नसेत रक्ताची अशी छोटी गुठळी तयार होते त्याला 'थ्रोम्बोफ्लेबायटीस' अथवा 'वरच्या नसेतील गुठळी' असे म्हटले जाते. ही डी.व्ही.टी अथवा पी.ई. सारखी नसते. डी.व्ही.टी व पी.ई. होण्याची मुख्य कारणे :-  शस्त्रक्रिया (Surgery)  प्रदीर्घकाळ हालचालरहित अवस्था (Prolonged Immobility)  मोठी इजा / दुखापत (Major Trauma) ज्या महिला इस्ट्रोजेन - प्रोजेस्टेरॉन (स्त्रीसंप्रेरके) घटक असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात किंवा संप्रेरक बदलोपचार (Hormone Replacement Therapy) घेताहेत अशांना डी.व्ही.टी आणि पी.ई. व्याधीची शक्यता असते. तथापि याचे प्रमाण अत्यल्प आहे सुमारे ३००० गर्भावस्थेतल्या महिलांपैकी एका महिलेत डी.व्ही.टी. व पी.ई. उद्भवण्याचा धोका असतो. ह्यासोबत उपरोक्त विविध धोकादायक कारणांसोबत काही अनुवांशिक जनुकीय दोष असलेल्यांत डी.व्ही.टी व पी.ई. चा धोका असतो याला 'थ्रोम्बोफिलीया' असे म्हणतात. ज्यावेळी रोहिणीत महिलांत (हृदयातून शरीराकडे रक्त नेणारी) रक्ताची गुठळी तयार होते त्याला ' रोहिणी अंतर्गत गुठळी'(Arterial Thrombosis) असे म्हणतात.(शुद्धरक्त वाहिनीतली गुठळी) ह्या गुठळी मुळे 'हृदयाघात'(Heart Attack) किंवा पक्षाघात (लकवा) होवू शकतो. थ्रोम्बोफिलीया व्याधी असलेल्या व्यक्तींत विशेष करून रोहिणीत होणारी गुठळी होण्याचे (Arterial Thrombosis) प्रमाण खूपच कमी असते. रोहीणींत गुठळी होण्याच्या कारणांत धुम्रपान (Smoking), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) व रक्तातील वाढलेले मेदाचे प्रमाण (High Lipid Level) ही प्रमुख कारणे असतात.  रक्त चाचण्या (Blood Tests) डी.व्ही.टी. (खोलवरच्या नीलेतील गुठळी) किंवा पी.ई. (हृदयाकडून फुफ्फुसात जाणाऱ्या रोहीणीतील गुठळी) झाल्यानंतर' 'थ्रोम्बोफिलीया'च्या चाचणीसाठी रक्त तपासले जाते. जर आपणाला डी.व्ही.टी. किंवा पी.ई. होवून त्यातून बरे झाले असाल तर आपले डॉक्टर खालील तपासण्या सुचवू शकतात.  त्या खालीलप्रमाणे आहेत : - गुठळी विरघळवणारा उपचार पूर्ण झाल्यानंतर आपणास 'थ्रोम्बोफिलीया'ची व्याधी शोधण्यासाठी चाचणी करवून घेतात जर ह्या चाचणीतून असे निदर्शनास आले की तुम्हाला ही व्याधी आहे तर तुम्हाला असे होण्याचे कारण अंशतः तरी (Partly) स्पष्ट होवून जाते. दुसऱ्यांदा गुठळी होण्याचे प्रमाण 'थ्रोम्बोफिलीया' असलेल्या रुग्णांतही 'थ्रोम्बोफिलीया' नसलेल्यांपेक्षा खूप जास्त नसते म्हणूनच रक्त गोठू न देणारा डी.व्ही.टी. किंवा पी.ई. चा औषधोपचार हा 'थ्रोम्बोफिलीया' नसलेल्यांपेक्षा असलेल्यांत कदाचित वेगळा असा नसेलही. काहीवेळा आपले डॉक्टर दीर्घकाळ औषधोपचार सुचवितात. हा कालावधी 'थ्रोम्बोफिलीया' आहे किंवा नाही यापेक्षा कोणत्या कारणांमुळे तुम्हाला डी.व्ही.टी. किंवा पी.ई. ची व्याधी झाली याअनुषंगाने देतात उदा. कुठल्या शस्त्रक्रियेनंतर ही व्याधी तर झाली नाही ?आणि कुटुंबात डी.व्ही.टी. किंवा पी.ई.ची व्याधी असण्याचा पूर्वीचा इतिहास तर नाही ?यावर उपचाराचा कालावधी ठरवतात. क्रमशः धन्यवाद ! डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कॅन्सर तज्ञ)
 2021-11-10T06:38:16

Keywords