Nashik
08048032699
+917774073485

रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १६ [ भाग १] ...

रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १६ [ भाग १] सिलीयाक विकार [ Celiac Disease ] हा एक जुनाट स्वरूपाचा / दिर्घावधीचा पचनासंबंधी विकार असून यात लहान आतड्यातील अन्न घटक शोषणा-या पेशी स्तराला ग्लूटेन ची ॲलर्जी होऊन हानी पोहचते ज्यामुळे ही व्याधी होणा-या रुग्णात शोषण समस्या उद्भवून विविध खनिजे व पोषक घटकांची कमतरता होऊन अनेक लक्षणे दिसून येतात. मुळात हा लहान आतडयाचा विकार आहे. आपण जाणताच की आपण खाल्लेले अन्न तोंडातून अन्न नलिकेद्वारे पोटात जाते व तेथून पुढे लहान आतड्यात या अन्नात विविध रस व विकरे मिसळली जातात व त्याचे विघटन होऊन लहान आतड्यात असलेल्या बोटासारख्या आकाराच्या शोषण उंचवट्यातुन [Villi ]शोषण होऊन प्रथिने , कर्बोदके , स्निघ्ध पदार्थ रक्तात मिसळून शरीराला मिळतात. सिलीयाक विकारात एक प्रतिकार यंत्रणेशी संबधित ॲलर्जी तयार होऊन पचन दोष तयार होतो. लहान आतड्याच्या आतील स्तरात वैज्ञानिकांनी या मागे ग्लुटेन नावाचा घटक या विकारास कारण ठरतो असे शोधून काढले आहे. हे ग्लुटेन गव्हात , राय , बार्ली , व अत्यल्प प्रमाणात ओट मध्ये आढळतो. प्रतिकार यंत्रणेच्या संवेदनेने [ Reaction] या ठिकाणी सूज येऊन हळूहळू आतल्या स्तराचा [शोषणास आवश्यक ] ऱ्हास होऊ लागतो व कालांतराने आहार पुरेसा घेऊन देखील जेवणातून मिळणाऱ्या पोषण घटक योग्य प्रकारे शोषले जात नाहीत त्यामुळे जीवनसत्वे , खनिजे व वाढीस आवश्यक असणारे पोषण घटकांच्या कमतरतेने विविध लक्षणे व चिन्हे या रुग्णात दिसून येतात. ग्लुटेन हा एक प्रथीनाचाच प्रकार असून गव्हात , बार्लीत , राय व काही वेळा ओट या धान्यात आढळतो . सिलीयाक विकारात आपण आधी पाहील्या प्रमाणे लहान आतड्याच्या शोषण करणाऱ्या उंचवट्याना हानी पोहोचून ऱ्हास होतो याचा वैज्ञानिकांनी आणखी शोध घेतल्यावर त्यांना हा विकार काहीसा जनुकीय दोषातून व काहीसा अनुवांशिक आढळला. शेवटी काही लोकात काही विशिष्ट सदोष जनुके [ गेनेस] आढळली जी या रुग्णातच होती. इतर सामान्य व्यक्तींत दिसून आली नाहीत. आपण आधी पहिले आहेच की ग्लूटेन हे विविध प्रथीनांपैकी एक आहे. ज्या घटकापासून हे ग्लुटेन तयार होते त्यांना ग्लिआडीन म्हणतात जे मद्यात [ alcohol ] विरघळते. हे ग्लिआडीनच खऱ्या अर्थाने प्रतिकार यंत्रणेद्वारे प्रतिक्रिया घडवून आणते व हा विकार होतो . आता सिलीयक विकारात लहान आतड्यात नेमके काय घडते ते बघूया. लहान आतड्यात अन्न पचनास पुरेशी जागा उपलब्ध व्हावी या हेतूने बोटासारखे उंचवटे निसर्गत:च असतात त्यांना व्हिलाय असे इंग्रजी नाव आहे. आपण त्यांना मराठीत आतड्यातील अन्नशोषक उंचवटे / बोटे म्हणू शकतो . या उंचवट्यामुळे अन्न पचनास पुरेशी जागा उपलब्ध होऊन विविध पोषक घटकांचे व्यवस्थित शोषण होते. सिलीयाक विकारांत या उंचवट्याना सूज येते व ऱ्हास होऊन ते सपाट होतात. [ शोषण योग्य रहात नाहीत ] यामुळे अन्न पचनाला लागणारी जागा कमी-कमी होत जाते व पोषण घटकांचे शोषण मंदावते व या मंदावलेल्या अवस्थेस सदोष शोषण इंग्रजीत [ Malabsorption ] मालॲबसॉर्प्शन असे म्हणतात. याचा परिणाम होत जाऊन त्याचा वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन कुपोषण [ malnutrition ] जडते. आता या विकारात किती प्रमाणात अन्न शोषण उंचवट्याचा ऱ्हास झाला आहे त्यानुसार व्यक्तिपरत्वे वेगवेगळी लक्षणे आढळतात. या ऱ्हासाचा आतड्याच्या लांबीवरही परिणाम होतो . जर एखाद्या रुग्णांत आतड्याच्या काही भागातच अन्नशोषण उंचवटे ऱ्हास पावले असतील तर अशा व्यक्तीत पूर्ण ऱ्हास झालेल्या रुग्णाच्या मानाने कमी लक्षणे दिसून येतील. या विरुद्ध पूर्ण ऱ्हास झालेल्या र्ळूल्ल्ग्नात लक्षणे तीव्र स्वरुपाची दिसतील. सर्व साधारणपणे सिलीयक विकार लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात विशेष करून आढळतो . त्या मानाने शेवटच्या भागात तितकासा दिसून येत नाही. सिलीयाक विकारात आढळणारी लक्षणे , चिन्हे :- सुरुवातीस पहिल्याप्रमाणे लक्षणे ही सदोष शोषणाच्या प्रमाणावर अवलंबून असतात, लक्षण विरहीत अवस्थेपासून सौम्य ते अतितीव्र लक्षणे ही दिसून येतात . याचे दोन भाग पाडता येतील. १] सदोष शोषणामुळे दिसून येणारी लक्षणे व चिन्हे २] कुपोषणातून [ खनिजे, जीवनसत्वे यांच्या अभावाने ] आढळणारी लक्षणे व चिन्हे १] सदोष शोषणामुळे दिसून येणारी लक्षणे व चिन्हे [signs & amp; symptoms due to malabsorption ] अन्नातील पोषक घटकांचे मुख्यतः तीन भाग असतात. कर्बोदके , प्रथिने व स्निग्ध घटक. या तिन्ही घटकांचे सिलीयाक विकारात शोषण कमी होऊ लागते. तथापी स्निग्ध पदार्थांच्या शोषणावर या विकाराचा खास परिणाम होतो. पोट व आतड्यांची बरीच लक्षणे सिलीयाक आजारात ते स्निग्ध पदार्थांच्या शोषण अभावाने दिसून येतात. स्निग्ध पदार्थांच्या सदोष शोषणामुळे [ कमी शोषल्याने ] जुलाब, दुर्गंधीयुक्त वायू सरणे, पोट फुगणे व शौचावाटे ही स्निग्ध पदार्थ जाणे ई. त्रास संभवतात . आतड्यातील शोषण उंचवटे नाहीसे झाल्याने कर्बोद्कांच्या शोषणातही विविध समस्या उद्भवतात त्यात लॅक्टोजशर्करेचा ही समावेश होतो. लॅक्टोजशर्करा ही सुरुवातीस दुधात आढळते . लॅक्टोजशर्करा ही ग्लुकोज व गॅलॅक्टोज ह्या दोन छोट्या साखरेपासून बनलेली असते . लॅक्टोजशर्करा आतडीतुन शोषली जाऊन शरीराला मिळण्यासाठी तिचे ग्लुकोज व गॅलॅक्टोज या दोन प्रकारात विघटन होणे आवश्यक ठरते व तरच ही लॅक्टोजशर्करा आतडीच्या या शोषण उंचवट्याद्वारे शोषली जाऊन शरीराला मिळते व हे लॅक्टोजशर्करेचे विघटन कार्य लॅक्टोज नावाच्या विकरामुळे [ enazyme ] होत असते जे या उंचवट्यातुनच स्त्रवते. आता सिलीयाक आजारात ह्या उंचवट्याचा ऱ्हास झाल्याने लॅक्टोज स्त्रवणाऱ्या पेशीही नष्ट होतात व परिणामतः कार्बोद्कांच्या शोषणाची समस्या उद्भवते. क्रमशः धन्यवाद ! डॉक्टर प्रितेश जुनागडे रक्तविकार व कॅन्सर तज्ञ
 2022-01-19T08:39:12

Keywords