Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +9108048036867 (International callers) or 08048036867 (Indian callers).
रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प - २ (भाग २)
लोह कमतरतेतून होणारा पंडुरोग (Iron Deficiency Anemia)
मागच्या भागात आपण लोह कमतरतेतून होणारा पंडुरोग (Iron Deficiency Anemia) याची लक्षणे, निदान आणि कारणे यासंबंधी पाहिले आता त्यापुढील भाग पाहूया.
याची कारणे कोणती ?
७) औषधे :- काही वेळा दुसऱ्या कुठल्यातरी आजारासाठी उपचार केले जातात व त्यासाठी वापरली जाणारी औषधे रक्तस्त्रावाला (आतड्यांच्या आत ) कारणीभूत ठरतात . उदा. अस्पिरीन. इतर वेदनाशामक औषधांत आयबुप्रोफेन, नॅप्रोक्झेन, डायक्लोफेनॅक इ. यांनी देखील काही लोकांना त्रास संभवतो.
८) मुत्रमार्गातील रक्तस्त्राव - अल्पप्रमाणात परंतु सातत्याने होणाऱ्या काही मुत्रपिंडाच्या आजारांत मूत्रमार्गातून होणारा रक्तस्त्राव लक्षात येत नाही व पंडुरोगाचे कारण ठरतो.
* मला काही तपासण्यांची आवश्यकता आहे का?
लोह कमतरतेच्या कारणांचा शोध घेणे महत्वाचे आहे. काही लोकांत त्याचे कारण सहज, वरवरच्या तपासणीत दिसून येते उदा. गर्भावस्थेतील स्रीयामधला पंडुरोग, ज्या स्रियांना ऋतुस्त्राव अधिक होतो अशा स्रिया. अशा रुग्णांत जर दुसरे काही त्रास नसतील तर इतर तपासण्या करायला सांगितल्या जात नाहीत. परंतु ज्या अवस्थांमध्ये आजाराचे कारण वरचे वर सापडत नाही व कारण स्पष्ट होत नाही अशांना पुढील तपासण्या डॉक्टर करायला सांगतात.
यात खालील तपासण्या केल्या जातात :-
यात - कुठे रक्तस्राव आतल्या आत तर होत नाही ना? हे पाहण्यासाठी दुर्बिणीची तपासणी सुचविली जाते ज्यात अन्ननलिका , जठर व आतड्याच्या पहिल्या भागाची तपासणी केली जाते. ज्यावेळी इथे कारण आढळून येत नाही त्यावेळी गुदद्वारावाटे दुर्बिणीची नळी टाकून मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते व शोध घेतला जातो. काही वेळा बेरीयम ची पावडर पाजून क्ष-किरण (X-Ray) छायाचित्रे घेतली जातात.
* शौचाच्या तपासणीत जंतांचा शोध घेतला जातो.
* आतड्याच्या आतील भागाचा अतिशय छोटासा तुकडा (Biopsy) काढून आतड्याचा कुठला विकार तर नाही? याचा शोध घेतला जातो.
* ह्याशिवाय वरील तपासण्यांत काहीही कारण स्पष्ट न झाल्यास त्या पुढील तपासण्या सुचविल्या जातात.
लोह कमतरतेने होणाऱ्या पंडुरोगावर काय उपचार केला जातो?
लोहाच्या गोळ्या साधारणपणे सर्वच लोह कमतरतेच्या पंडूरुग्णांत दिल्या जातात. इतरही उपचार सुचविले जातात परंतू ते आढळून येणाऱ्या कारणांनुसार असतात.
लोहाच्या गोळ्या - विविध प्रकारच्या गोळ्या तसेच पातळ औषधाच्या स्वरुपात लोह बाजारात मिळते. त्यातले कुठलेही एक आम्ही सुचवितो. औषधोपचारांचा कालावधी हा पंडुरोगाच्या स्वरूपावर अवलंबून असतो (सौम्य /मध्यम /तीव्र ). काही आठवड्यांनी रक्ताची तपासणी करून औषधोपचाराची परिणामकारकता तपासली जाते .
जेवणासोबत जर चहा पिण्यात आला तर लोह शोषण कमी प्रमाणात होते. त्यामुळे ते टाळलेलेच योग्य, त्या ऐवजी 'क' जीवनसत्त्वानी परिपूर्ण असे एखादे पेय जेवणासोबत घ्यायला काहीच हरकत नाही. गोळ्या किंवा औषध (पातळ ) घेण्याच्या एक तास अगोदर व नंतर दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेऊ नये (उदा. पेढा, बर्फी इ. ) याचे कारण दुधामुळे लोहाच्या शोषणात अडथळा येऊ शकतो.
लोहाच्या गोळ्या घेऊन काही लोकांना सहदुष्परिणाम दिसून येतात यात आजारी असल्यासारखे वाटणे (मळमळणे), पोट भरल्यासारखे वाटणे, शौचास साफ न होणे (बद्धकोष्ठ्ता) किंवा जुलाब होणे इ. असे त्रास झाल्यास आम्हाला जरूर सांगा. गोळी / औषध घेणे थांबू नका अन्यथा पंडुरोग बरा व्हायला अडचण येईल.
खालील काही गोष्टी केल्यास सहदुष्परिणाम कमी करता येतील ते असे :-
१) लोहाची गोळी जेवणासोबत घ्यावी. जेणेकरून दुष्परिणाम कमी होतील पण उपचाराचा कालावधी वाढेल कारण अन्नासोबत गोळी घेतल्याने लोहाचे शोषण कमी प्रमाणात होते.
२) लोहाचे प्रमाण कमी असलेली गोळी घ्या परंतू उपचाराचा कालावधी वाढेल याची जाणीव असू द्या.
लोहाच्या गोळ्यांनी शौचाचा रंग काळसर होतो काळजी नसावी.
*लक्षात ठेवा - लोहाच्या गोळ्या लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात . लोहाचे अतिरिक्त प्रमाण मुलांसाठी घातक ठरू शकते. (खायला गोड लागल्याने लहान मुले खातात )
काही लोकांना लोहाच्या गोळ्या सहजासहजी सहन होत नाहीत व काहींमध्ये लोहाचे शोषण आतड्यांतून होत नाही अशावेळी या रुग्णांसाठी काही आठवड्यांपर्यंत इंजेक्शन स्वरुपात लोह द्यावे लागते (काहीवेळा एकच इंजेक्शन द्यावे लागते ) काहींमध्ये इंजेक्शन देण्यापूर्वी संवेदन क्षमता चाचणी (Sensitivity Test) करून घ्यावी लागते कारण काहींमध्ये तीव्र प्रतिक्रिया (REACTION) येऊ शकते.
जर आपण होमियोपॅथिक किंवा आयुर्वेदिक औषधे घेत असाल तर त्याची पूर्वकल्पना डॉक्टरांना जरूर द्यावी.
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कर्करोग तज्ञ)
Anemia
Bleeding Related Problem
Thrombophilia and Associated Problems
Acute Leukemia Treatment
Chronic Leukemia Treatments
Lymphoma Treatment
Myeloma Treatment
Haemophilia Treatment
Thrombocytopenia and Low Platelets Treatment
Dengue Fever Treatment
Pregnancy Related Hematological Problems
Clinical Laboratory Blood and Transfusion Problems
Pediatric and Neonatal Hematology Problems
Stem Cell Therapy
Bone Marrow Transplant
Thalassemia
Sickle Cell Anemia
Deep Vein Thrombosis
Pulmonary Embolism
Bone Maroow Test
Polycythaemia
Bone Marrow Transplantation
Haemophilia Care Centre
Acute Leukaemia
Medical Oncology
Haematology and Haemato Oncology
Bone Marrow Transplantation