Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +918048036867 (International callers) or 08048036867 (Indian callers).
रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – ४ (भाग १)
ITP (Idiolpathic Thrombocytopenic Purpura)
(आय.टी.पी अर्थात इडियोपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा )
अकारण रक्त बिंबिकाल्पतेने होणारा रक्तस्त्राव
[ रक्त बिंबिका योग्य प्रमाणापेक्षा कमी झाल्याने रक्त गोठणक्षमता कमी होऊन होणारा रक्तस्त्राव (शरीरांतर्गत) ]
रक्तबिंबिका म्हणजे काय? (Platelets)
ह्या रक्तात असणाऱ्या तीन प्रकारच्या पेशींपैकी एक होत. जशा लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी तशाच ह्या रक्तबिंबिका. ह्यांचा आकार छोटा असून त्या चिकट असतात आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत त्यांचाच सहभाग असतो. आपल्याला लागल्यानंतर ठराविक वेळेच्या आत रक्त गोठविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी ह्या रक्तबिंबिकांची असते. ह्यांची संख्या प्रत्येक घनमिलीमिटर मध्ये दीड ते साडेचार लाखांच्या दरम्यान असते. जे १.५ ते ४.५ लाख या रीतीने सांगितल्या जातात.
अकारण रक्तबिंबिकाल्पताजन्य रक्तस्त्राव म्हणजे काय? (ITP म्हणजे काय?)
हि एक रक्त व्याधी असून ज्यात रक्तबिंबिकांची संख्या आवश्यक प्रमाणापेक्षा कमी होते. आपल्याला माहिती आहेच कि रक्त गोठ्नाची क्रिया रक्तबिंबिकांमुळेच होते. परंतु यांची संख्या घटल्याने वरवरच्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबत नाही, हिरड्यांतून रक्त येते व काही वेळा शरीरांतर्गतही रक्त स्त्राव होतात.
---अकारण (Idiopathic) - म्हणजे ज्याच्या कारणांचा अद्याप शोध घेता आलेला नाही.
---रक्तबिंबिकाल्पता (Thrombocytopenia) - म्हणजे आवश्यक प्रमाणसंख्येपेक्षा कमी झालेली रक्तबिंबिकांची संख्या.
---रक्तस्त्राव (Purpura) - त्वचेखाली आलेला निळसरपणा आतल्या आत रक्त वाहिन्या फुटून (थोड्याश्या माराने देखील)
हे कशामुळे होते ? (अकारण 'रक्तबिंबिकाल्पताजन्य' रक्तस्त्राव)
अकारण - म्हणजे ज्यांचे अजून कारण कळलेले नाही. बहुसंख्य रुग्णांत सहसा कोणतेही दृश्य कारण आढळत नाही. लहान मुलांमध्ये विषाणूजन्य संसर्ग असते. ज्यावेळी एखादे कारण मिळते त्यावेळी खालील पैकी कुठल्यातरी कारणाचा परिणाम स्वरूप ते असते.
a) औषधे - (औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या परवानगी शिवाय परस्पर घेतलेली औषधे)
ब) रोगसंसर्ग
c) रोगप्रतिकार क्षमतेतील दोष
'रक्तबिंबिकाल्पताजन्य' रक्तस्त्रावात कोणकोणती लक्षणे व दोष दिसून येतात?
ह्यात रक्त तपासणी केल्यावर रक्तबिंबिकांची संख्या एक लाखाच्या आत प्रत्येक घनमिमी ला दिसून येते (जी दीड ते साडेचार लाखांदरम्यान असायला हवी.) बऱ्यापैकी रक्तस्त्राव होईस्तोवर लहान मुलांत ही संख्या (रक्तबिंबिकांची) घटत जाऊन दहा हजारांपर्यंत किंवा त्याहूनही कमी होते. रक्तबिंबिकांची संख्या जेवढी कमी तेवढी रक्तस्त्रावाची शक्यता अधिक. कारण, रक्तस्त्राव थांबविण्याचे प्रमुख कार्य रक्तबिंबिकाच पार पाडत असतात. लक्षणे ही रक्तस्त्रावाच्या वाढत्या प्रमाणावर अवलंबून असतात. व्यक्ती गणिक वेगवेगळी लक्षणे दिसून येवू शकतात.
लक्षणांपैकी काही खालील लक्षणे सांगता येतील :-
---त्वचेखालील रक्तस्त्राव हे एक प्रमुख लक्षण व बऱ्याच जणांमध्ये दिसून येते. काही रुग्णांत निळसर चट्टे पायांवर दिसतात. रक्तबिंबिकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यास हिरड्यातून रक्त येणे, घोळणा फुटणे (नाकातून रक्तस्त्राव) रक्ताची लघवी होणे व काहींना मेंदूत रक्तस्त्राव होऊन जीवाला गंभीर धोका निर्माण होतो.
---ह्या विकारात दिसून येणारी लक्षणे इतर रक्तविकारांच्या व इतर शारीरिक आजारांच्या सारखीच असतात.(सदृश दिसून येतात)
क्रमशः
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कर्करोग तज्ञ )
Anemia
Bleeding Related Problem
Thrombophilia and Associated Problems
Acute Leukemia Treatment
Chronic Leukemia Treatments
Lymphoma Treatment
Myeloma Treatment
Haemophilia Treatment
Thrombocytopenia and Low Platelets Treatment
Dengue Fever Treatment
Pregnancy Related Hematological Problems
Clinical Laboratory Blood and Transfusion Problems
Pediatric and Neonatal Hematology Problems
Stem Cell Therapy
Bone Marrow Transplant
Thalassemia
Sickle Cell Anemia
Deep Vein Thrombosis
Pulmonary Embolism
Bone Maroow Test
Polycythaemia
Bone Marrow Transplantation
Haemophilia Care Centre
Acute Leukaemia
Medical Oncology
Haematology and Haemato Oncology
Bone Marrow Transplantation