रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १४ [भाग ३ ]
थ्रॉम्बोफिलीया - (Thrombophilia)
(रक्त वाहिन्यांत आपोआप गुठळी होण्याची व्याधी )
लक्षात ठेवायच्या महत्वपूर्ण गोष्टी :-
& gt; गंभीर परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हयगय करू नका, वेळ वाया घालवू नका.
& gt; तुम्हाला दुसऱ्यांदा डी.व्ही.टी.किंवा पी. ई. चा त्रास वाटल्यास मदत घ्यायला संकोच करू नका व उशीर करू नका.
माझ्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही थ्रोम्बोफिलीयाची तपासणी करून घ्यायला हवी?
सर्वच लोकांत रक्त गोठण समस्यांचा शोध घेणे उपयोगाचे नाही तथापि जर एखाद्या व्यक्तीला डी. व्ही. टी. किवा पी ई ची व्याधी होऊन गेलेली आहे व त्याच्या तपासणीत
'थ्रोम्बोफिलीया ' असल्याचा पुरावा मिळाला तर त्याच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना 'थ्रोम्बोफिलीया ' व्याधी तर नाही याचा शोध घेणे शक्य आहे हे करवून घेण्याचा उद्देश असा की कुटुंबातील इतर कोणाकोणाला धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास डी. व्ही. टी. किवा पी ई ची व्याधी होण्याचा धोका आहे ते लवकर कळावे.
ह्यालाच संभाव्य रुग्ण शोध(Case Finding) म्हणतात. अशी तपासणी करून कितपत फायदा होतो हे अद्याप सिद्ध झालेले नाही. ज्यांना डी. व्ही. टी. किवा पी ई ची व्याधी आहे अशा रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला डी. व्ही. टी. किवा पी ई चा त्रास झाल्यास आपल्या वैद्यकीय मदतनीसांना कुटुंबातल्या किंवा जवळच्या नात्यात वरील त्रास झालेला असल्याची माहिती जरूर द्यावी. त्यांनी थ्रोम्बोफिलीयाची तपासणी केलेली असली किंवा नसली तरीही!
* मुलांचीही तपासणी करायला हवी?
सर्वसाधारण नियमान्वये मोठ्या मुलांच्या तपासणीची गरज नाही. लहान मुलांत रक्तात गुठळी न होऊ देणारी विशेष व्यवस्था असते. पौगंडावस्थेत त्यांच्यात थ्रोम्बोफिलीयामुळे रक्तात गुठळी व्हायची शक्यता वाढत जाते असे काही नसते. तेरा ते अठरा वयोगटातल्या(Teenagers) मुलींची 'थ्रोम्बोफिलीयाची 'तपासणी करून घ्यायला हरकत नाही कारण यामुळे त्यांनी भविष्यात गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात की नको याचा निर्णयावर प्रभाव पडतो.
विशिष्ट क्रियांसंदर्भात :-
• मला शस्त्रक्रियेची गरज भासल्यास मी करायला हवे?
जर शस्त्रक्रिया पूर्व नियोजित असेल अशावेळी डॉक्टरांना थ्रोम्बोफिलीया असल्याची आधीच माहितीतपासणी कक्षातच शस्त्रक्रियेआधी द्यावी. डॉक्टर व परिचारकांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात भरती / दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा सांगावे.
मला लांब अंतराचा प्रवास करावा लागला तर मी काय करावे?
प्रवासा दरम्यान पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी सातत्याने थोडे थोडे पाणी पीत राहावे व प्रवासा दरम्यान पायांचा व्यायाम करत जावा. अशी ही एक माहिती पुढे आली आहे की काही विशिष्ट दाब देणारे मोजे(Support Stockings) वापरून फायदा होवू शकतो. तुमचे डॉक्टर अस्पिरीनची गोळीहि घ्यायला सांगू शकतात . काही लोकांना क्वचित प्रसंगी जास्त धोका असलेल्यांत हिपॅरीनचे इंजेक्शन ही दिले जाते किंवा इतरही औषधे द्यावी लागतात. ह्यासंबंधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
महिला - गर्भनिरोधक गोळ्या सुरक्षित आहेत का?
तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्यांत इस्ट्रोजेन नावाचे संप्रेरक असते पण त्यामुळे डी.व्ही.टी. किंवा पी.ई. व्याधी होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. दरवर्षी एक लाख गर्भनिरोधक गोळ्या नियमितपणे घेणाऱ्या महिलांपैकी २० ते ३० जणींना डी.व्ही.टी. किंवा पी.ई. ची व्याधी होते. जर आधीच तुम्हाला डी.व्ही.टी. किंवा पी.ई. ची व्याधी झालेली आहे व तुम्ही वर सांगितलेल्या गोळीपैकी कुठलीही गर्भनिरोधक गोळी तुम्ही घेत असाल तर दुसऱ्यांदा डी.व्ही.टी. किंवा पी.ई. चा धोका बऱ्याच प्रमाणात वाढतो. म्हणून उपरोक्त गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांकडून सखोल माहिती घेतल्याशिवाय व घेण्याची कारणे समजावून, चर्चा केल्याशिवाय घेऊ नयेत. इतरही प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत ज्या डी.व्ही.टी. किंवा पी.ई. व्याधीचा विचार करता सुरक्षित असतात व त्यांत फक्त प्रोजेस्टेरॉन नावाचे संप्रेरक असते. (यांना मिनीपिल, अथवा छोट्या गोळ्याही म्हटले जाते.)
जर कुटुंबात कोणाला डी.व्ही.टी किंवा पी.ई.ची व्याधी आधी कुणाला झाली असेल तर अशा व्यक्तींनी इस्ट्रोजेनच्या गोळ्या घेण्याआधी धोक्यांची चर्चा डॉक्टरांशी करायला हवी.
महिला -संप्रेरक बदलोपचार (Hormone Replacement Therapy)सुरक्षित आहे का?
गर्भनिरोधक गोळ्यांसाठी जी काळजी तुम्ही घ्याल तीच काळजी यासाठीही घ्यायची असते. (वर बघा.) महत्त्वाची गोष्ट ही आहे की या मुद्द्यावर डॉक्टरांशी व्यवस्थित चर्चा करावी.
*महिला -'थॉम्बोफिलीया' व्याधी असलेल्या सुरक्षितपणे गर्भवती होवू शकतात ? या व्याधी असलेल्या बहुतेक महिला सुरक्षितपणे गर्भवती होवू शकतात. यासाठी आपल्या डॉक्टरांकडून स्पष्ट माहिती व गर्भवती राहण्यासंबधी काय आवश्यकता आहेत याचा सल्ला अवश्य घ्यावा. गर्भवती झाल्याचे लक्षात आल्याबरोबर डॉक्टरांना त्याची माहिती द्या. लक्षात ठेवा 'वॉरफारिन'च्या गोळ्या चालू असतांना गर्भवती होणे टाळावे. 'वॉरफारिन' घेत असतांना गर्भवती झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना त्याची माहिती द्या.
कृपया अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – (रक्तविकार व कॅन्सर तज्ञ)
Keywords





