Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +918048032699 (International callers) or 08048032699 (Indian callers).
ह्याला बऱ्याच वेळा 'ब्लडकॅन्सर' ही म्हटले जाते. ही कर्कव्याधी अस्थिमगजाची आहे. (आपल्या शरीरात पेशी निर्मितीचा कारखाना म्हणजे अस्थिमगज - ही तिथली व्याधी) 'कर्करोग' हा मुळात शरीरातल्या पेशींचाच आजार आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगात एका गोष्टीचे साम्य असते ते म्हणजे ह्या पेशी असामान्य असतात व शरीराच्या नियंत्रण व्यवस्थेला दाद देत नाहीत. ह्यांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होते कारण त्यांची संख्या गुणाकाराच्या पटींत वाढते व त्या शरीराच्या इतर पेशींपेक्षा जास्त काळ जीवंत राहू शकतात व अनियंत्रित वाढतात किंवा दोन्ही गोष्टी होतात (संख्या ही जास्त व आयुष्यही जास्त). रक्ताच्या कर्करोगात ह्या कर्करोगग्रस्त पेशींची संख्या वाढते त्यांचा रक्तप्रवाहात समावेश होतो व त्या शरीरभर पसरतात. रक्ताच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. अनेक कर्करोग फक्त पांढऱ्या रक्त पेशींचेच आहेत. (ल्युकेमिया हा शब्द ग्रीक शब्दावरून आलेला आहे याचा अर्थ ल्युक - पांढरे, मिया-रक्त - अर्थात पांढरे रक्त) जर आपल्याला ही कर्कव्याधी असेल तर तिचा प्रकार माहित असणे अत्यंत आवश्यक आहे कारण विविध प्रकारांसाठी विविध उपचार व विविध बऱ्यावाईट शक्यता आहेत. विविध प्रकारच्या कर्करोगांची माहिती करून घेण्याआधी आपण सामान्य रक्त पेशी व त्यांच्या निर्मितीबद्दल काही मुलभूत गोष्टींची माहिती करून घेऊया जेणे करून ही व्याधी समजायला सोपे जाईल. अस्थिमगज (Bone Marrow), मुलपेशी (Stemcell), रक्तपेशी निर्माण (Blood Cell Production) अस्थिमगज - रक्तपेशींची निर्मिती अस्थिमगजातल्या मुलपेशींपासून होत असते. अस्थिमगज हा एक मऊ, जाळीदार हाडांच्या मधला भाग असतो शरीराच्या मोठ्या (Pelvis) सपाट हाडांत यांचे प्रमाण जास्त असते त्यात कमरेचे मोठे हाड व दोन्ही बाजूच्या फासळ्या येऊन मिळतात ते छातीचे मध्यभागी असलेले मोठे हाड (Sternum) ह्यांत अस्थिमगजाचे सर्वाधिक प्रमाण असते. सततच्या रक्तपेशी निर्मितीसाठी आपल्याकडे सदृढ, सक्षम अस्थिमगज असणे आवश्यक आहे. हे अस्थिमगज सदृढ व सक्षम राहावे म्हणून आपल्या रोजच्या आहारात निरनिराळे पौष्टिक घटक, विविध जीवनसत्त्वे व लोह यांचा समावेश हवा.
रक्तनिर्मिती (Blood Production) आपल्या शरीरात रोज कित्येक अब्जावधी पेशींची निर्मिती होते प्रत्येक पेशींचे निश्चित असे आयुर्मान (जगण्याचा कालावधी) असते. उदा. लाल रक्त पेशींचे १२० दिवसांचे आयुष्य असते. काही पांढऱ्या पेशी काही तासच जीवंत राहतात. काही जास्त काळ राहतात. दररोज कित्येक अब्ज पेशी मरतात व त्यांचे जीवन संपण्याच्या वेळी विघटन केले जाते. ह्या सगळ्या क्रियेत एक संतुलन असते. पेशी निर्माण संख्या व पेशी हनन संख्या ह्यात सुसूत्रता व समन्वय आढळते त्यामुळे संतुलन टिकून राहते. अनेक घटक ह्या संतुलनास मदत करतात उदा. रक्तातील विशिष्ट संप्रेरके (Hormones) आणि रसायने (Chemicals) ही अस्थिमगजात असतात त्यांना 'वाढ घटक' (Growth Factor) असे म्हणतात त्यामुळे पेशींच्या निर्माणाची क्रिया नियंत्रित केली जाते व स्थिर ठेवली जाते.
रक्ताच्या कर्करोगाचे मुख्यतः ४ प्रकार पडतात ते असे :- १) Acute Lymphoblastic Leukaemia (ALL) - लिम्फोसाईट नावाच्या पांढऱ्या पेशींचा रक्ताचा कर्करोग (अल्पावधीचा) २) Chronic Lymphocytic Leukaemia (CLL) - दीर्घावधीचा लिम्फोसाईट नावाच्या पांढऱ्या पेशींचा रक्त कर्करोग ३) Acute Myeloid Leukaemia (AML) - अल्पावधीचा मायलॉईड पांढऱ्या पेशींचा कर्करोग (Myeloid - अशा मुळपेशी ज्यापासून न्यूट्रोफिल नावाच्या पांढऱ्या पेशींची निर्मिती होते) ४) Chronic myeloid Leukaemia (CML) - दीर्घावधीचा मायलॉईड पांढऱ्या पेशींचा (रक्त) कर्करोग
AML म्हणजे काय? अल्पावधीचा मायलॉईड पांढऱ्या पेशींचा कर्करोग म्हणजे काय?
ही एक अशी कर्कावस्था आहे ज्यात अस्थिमगजात मोठ्या प्रमाणात अपरिपक्व (अकार्यक्षम) पांढऱ्या पेशींची निर्मिती होते व ह्या मायलॉईड नावाच्या मुल पेशींपासून तयार होतात. त्यांना विकृत अपरिपक्व पेशी किंवा वैद्यकीय भाषेत ब्लास्ट म्हणतात. AML चे अनेक उपप्रकार आहेत ते नेमके पेशी परिपक्वतेच्या पायऱ्यांवर (Maturity Stages) आधारित असते. नेमकी कुठली पेशी कुठल्या पायरीवर कर्कग्रस्त होत आहे त्याचा शोध घ्यावा लागतो. या प्रकारचा कर्करोग हा विकृत स्वरूप धारण करतो आणि उपचार केला नाही तर (काही आठवड्यांतच) विकोपाला जातो. क्रमशः
धन्यवाद !
डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – ( रक्तविकार व कर्करोग तज्ञ )
Anemia
Bleeding Related Problem
Thrombophilia and Associated Problems
Acute Leukemia Treatment
Chronic Leukemia Treatments
Lymphoma Treatment
Myeloma Treatment
Haemophilia Treatment
Thrombocytopenia and Low Platelets Treatment
Dengue Fever Treatment
Pregnancy Related Hematological Problems
Clinical Laboratory Blood and Transfusion Problems
Pediatric and Neonatal Hematology Problems
Stem Cell Therapy
Bone Marrow Transplant
Thalassemia
Sickle Cell Anemia
Deep Vein Thrombosis
Pulmonary Embolism
Bone Maroow Test
Polycythaemia
Bone Marrow Transplantation
Haemophilia Care Centre
Acute Leukaemia
Medical Oncology
Haematology and Haemato Oncology
Bone Marrow Transplantation