Nashik
08048036867
+917774073485

रुग्णजागृती  ज्ञानमाला पुष्प – ८ (भाग १)· मायलोफाय...

रुग्णजागृती  ज्ञानमाला पुष्प – ८ (भाग १)

· मायलोफायब्रोसिस (Myelofibrosis)
(अस्थिमगजाचा आतील भाग जाडसर होऊन पेशी निर्मितीत अक्षम होण्याचा विकार)

मायलोफायब्रोसिस म्हणजे काय?
सामान्य (निरोगी) अस्थिमगजात रक्तनिर्मितीला आधारभूत होईल अशी सुक्ष्म तंतुंची व्यवस्था असते. मायलोफायब्रोसिस या विकारात हे सुक्ष्मतंतू जाडसर होतात, ज्यामुळे  अस्थिमगजात होणारे पेशीनिर्मितीचे कार्य थांबते व हे कार्य यकृतात व प्लीहेत सुरु होते याचा परिणाम स्वरूप त्यांचे (यकृत प्लीहा) आकारमान वाढते ते मुळ आकारापेक्षा बरेच मोठे होतात.

·  मायलोफायब्रोसिस कोणकोणत्या कारणांनी होतो?
असे मानले जाते की, सदोष मुलपेशींमुळेच (Abnormal Stem Cell) हा विकार होत असावा. सदोष मुलपेशीच तंतुमय जाडसर (रक्तनिर्मितीत अडथळा ठरणारी) उतींच्या निर्माणाचे मुख्य कारण आहेत व त्यामुळेच अस्थिमगजात अशी व्याधी तयार होते. काही वेळा जर आधीच कुठली तरी रक्तव्याधी असेल तर ही व्याधी होवू शकते. जसे, रक्तबिंबिका प्रमाणापेक्षा अत्याधिक असणे किंवा तांबड्या रक्तपेशींची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असणे . तथापि, याच्या मुळकारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. ही व्याधी जीवघेण्या / गंभीर संसर्गानंतरच्या (Serious Infections) रुग्णांमध्येही दिसून आली आहे.

· 'मायलोफायब्रोसिस' यात कोणकोणती लक्षणे दिसून येतात?
सर्वसाधारणपणे यात लक्षात येण्याजोगी कुठलीही लक्षणे दिसून नाहीत. नेहमीची रक्त तपासणी काही वेळा ही व्याधी असल्याचे सुचवू शकते. बऱ्याच रुग्णांना पंडुरोग (Anaemia)आहे किंवा दम लागतो म्हणून अथवा तपासणीत प्लीहेवर सूज आहे म्हणून रक्त तपासणी करायला सांगितले जाते त्यातुन ही व्याधी असल्याचे दिसून येते. काही रुग्णांना प्रचंड थकवा जाणवतो व रात्रीचा खूप घाम येतो, ताप असतो आणि थोड्याशा माराने रक्तस्त्राव होतो, कारण रक्त बिंबिकांची संख्या बरीच कमी झालेली असते.

·  ह्या विकाराचे निदान कसे केले जाते?
रक्त तपासणीत विकृत आकाराच्या तांबड्या रक्तपेशी दिसून येतात. ह्या सोबत अस्थिमगज तपासणीतल्या नमुन्याची जाडसर सदोष उतींसाठी तपासणी केली जाते,  (Bone Marrow) सोबतच रुग्णाच्या अस्थिमगजातल्या आतील हाडाचीही तपासणी करावी लागते.


                                                                                  क्रमशः
धन्यवाद !                      

डॉ. प्रितेश सुभाष जुनागडे – ( रक्तविकार व कर्करोग तज्ञ )

 2021-06-11T10:24:05

Keywords