Nashik
08048036867
+917774073485

रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १६ [ भाग २ ] ...

रुग्णजागृती ज्ञानमाला पुष्प – १६ [ भाग २ ] सिलीयाक विकार [ Celiac Disease ] आता लॅक्टोजशर्करेचे शोषण सदोष किंवा बाधित झाल्याने दिसून येणाऱ्या लक्षणांचा, चिन्हांचा विचार करू या. ज्या रुग्णांमध्ये सिलीयाक विकार आढळतो व लॅक्टोज सहन होत नाही अशांमध्ये लॅक्टोज या विकाराचे कमी झालेले प्रमाण दिसून येते. याचे कारण जनुकांत आढळते . लॅक्टोज या कार्बोद्कांच्या शोषण अभावामुळे / सदोष शोषणाने जुलाब, खुप प्रमाणात वायू सरणे [ Execessive Flatulence ] , पोटदुखी, पोट फुगणे – ताठरणे ई . लक्षणे दिसून येतात. हे असे होण्याचे कारण असे की लॅक्टोजचे पचन झाल्याने हळूहळू ते मोठ्या आतड्यात येते व मोठ्या आतड्यात सामान्य जीवाणूंची [ शरीराला उपकारक ] वस्ती असते. ही लॅक्टोज शर्करा तिथपर्यंत पोहोचल्यावर या जीवाणूद्वारा तयार झालेले लॅक्टोज विकार [ Lactase Enzyme ] या लॅक्टोज विकारामुळे लॅक्टोज शर्करेचे विघटन होऊन ग्लुकोज व गॅलॅकटोज या दोन प्रकारच्या शर्करेची निर्मिती होते व ही शर्करा हे जीवाणू स्वतः करता वापरतात. शरीराला त्यापासून काही फायदा होत नाही. दुर्देवाने जेव्हा लॅक्टोज शर्करेचे विघटन होऊन ग्लुकोज व गॅलॅकटोज या दोन प्रकारच्या शर्करेचे विघटन होऊन ग्लुकोज व गॅलॅकटोज तयार होते तेव्हा या जीवाणूद्वारे [ हायड्रोजन किंवा मिथेन ] वायू सोडला जातो / निघतो . यामुळे वायू सरण्याचे प्रमाण वाढते व हे सिलीयाक विकारात विशेषतः दिसतें. हा अतिरिक्त तयार झालेला वायू पोटातल्या मळांत मिसळतो व सिलीयाक विकार असलेल्याचे शौच / मळ शौचकुपातल्या भांड्यात तरंगते . मोठ्या आतड्यात पोहोचलेल्या सर्व लॅक्टोज शर्करेचे या जीवाणू वस्तीद्वारे विघटन होत नाही व ही उरलेली लॅक्टोज शर्करा मोठ्या आतडीतील जलभाग खेचते व त्यामुळे जुलाब होतात. २] कुपोषणातून [ खनिजे, जीवनसत्वे यांचा अभाव ] आढळणारी लक्षणे व चिन्हे :- जीवनसत्वे , खनिजे [ Vitamines & amp; Minerals ] यांच्या अभावामुळे वजनात घट, शरीरात अधिक प्रमाणात द्रव साठणे, पंडुरोग, हाडे ठिसूळ होणे, त्वचेखाली रक्त साकळणे, परिघीय चेतातंतूचे विकार , स्नायू, दुर्बलता ई. त्रास संभवतात . • वजनात घट व द्रवसंचय :- कर्बोदके , प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांचे शोषण पुरेशा प्रमाणात न झाल्याने त्याचा सरळ परिणाम होऊन वजन घटते परंतु सिलीयक विकाराच्या सर्व रुग्णात वजन कमी होईल असे होत नाही. याचे कारण बहुतांश रुग्णांना पोषण घटकांच्या अपुऱ्या शोषणाची तुट भरून निघण्यासाठी यांची भूक खूप प्रमाणात वाढते व त्यामुळे बऱ्याचअंशी ती कमतरता भरून निघते . बऱ्याच वेळा शरीरात द्रवाची साठवण [ संचय ] केली जाऊ शकते व त्यामुळेही वजन कमी झालेले दिसून येत नाही . उपोषणाच्या बऱ्याच पुढील अवस्थेत ही द्रव साचण्याची [ शरीरांतर्गत ] क्रिया दिसून येते याचे कारण प्रथिने कमी शोषली जाऊन एकंदर रक्तातही प्रथिनांचे प्रमाण घटते. आता असे होण्याचे कारण प्रथिनांची रक्तातील पटली खालावली कि, रक्तवाहिन्यांतून द्रव पाझरून शरीराच्या सामान्य उतीत साठू लागते . जोवर रक्तातील प्रथिनांची पातळी स्थिर असते, तोवर असे • होत नाही. सिलीयाक विकारात किंवा अशाच अन्य विकारात जेव्हा ही रक्तातील प्रथिनांची पातळी खालावते, तेव्हा रक्तवाहिन्यांतून द्रव पाझरून पायाच्या घोट्याजवळ , पायाच्या पंजावर सूज दिसून येते. • पंडुरोग :- ब १२ जीवनसत्व व लोह कमी प्रमाणात शोषले गेल्याने पंडूरोगास कारण ठरते • हाडे ठिसूळ होणे :- ड जीवनसत्व व कॅल्शीअम कमी प्रमाणात शोषले जाऊन हाडे ठिसूळ होतात. • किरकोळ धक्क्याने ही रक्तस्त्राव [ त्वचेखाली ] :- स्निग्ध पदार्थात विरघळणारे व रक्त गोठण्यास आवश्यक असलेले क जीवनसत्व न शोषले गेल्याने त्याच्या कमतरतेने असे त्वचेखाली रक्तस्त्राव होतात अथवा जखमेतून बऱ्याचवेळा रक्त वाहत राहते. • परिघीय चेताविकार [ Peripheral Neuropathy, Nerve Damage ] :- ब-१२ व थायामीन या जीवनसत्वांच्या कमतरतेने चेता तंतू क्षतिग्रस्त होवून तोल जाणे, स्नायूंची दुर्बलता , हातापायांना मुंग्या येणे , बधीरपणा येणे हे त्रास संभवतात . • संतती न होणे [ infertility ] :- सिलीयाक विकारावर उपचार न केल्यास स्त्रियांमध्ये वांझपणा येऊ शकतो अथवा मासिक पाळी येणे थांबू शकते, गर्भपात होणे किंवा कमी वजनाचे बाळे जन्माला येऊ शकतात. • स्यानुंची दुर्बलता :- पोटॅशिअम, मॅग्नेशीअम सारखे खनिजांचे शोषण न झाल्याने खूप प्रमाणात स्नायू दुर्बलता येणे, पेटके येतात व हातापायांना मुंग्या येणे , बधीरपणा जाणवणे हे त्रास होतात . • असामान्य यकृत चाचण्या [Abnormal Liver Test] :- सिलीयाक विकाराच्या अनेक रुग्णांत यकृताच्या विविध चाचण्या असामान्य येतात ज्या यकृताला इजा झाल्याचे दर्शवतात याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नसले तरी या चाचण्यांतून सिलीयक विकार असल्याची शंका घेता येते. यात [ Asparate amino transferase ] ॲस्पंरेट अमायनो ट्रान्स्फरेज आणि / किंवा [Leucine amino transferase] ल्युसीन अमायनो ट्रान्स्फरेज केल्या जातात .या नंतर सिलीयक विकारासोबत आणखी इतर कोणकोणते विकार असतात याची माहिती करून घेऊ या. सुमारे १०% सिलीयक विकाराच्या रुग्णात डर्माटायटीस हर्पेटीफार्मिस हा त्वचा विकार आढळतो . यात हातापायांवर , मानेवर , छातीच्या भागात डोक्यात कुल्ह्यांवर पुरळ येतात व खाजवतात . याशिवाय वारंवार तोंड येणे, लहान वयात आढळणारा [ इन्सुलिन शिवाय पर्याय नसलेला ] मधुमेह , थायरॉईड ग्रंथींची ऑटोइम्यून व्याधी , संधिवात, एस .एल.ई . या सोबत असू शकतात. सिलीयाक विकाराचे निदान ए, जी. ए . [Antigliadin antibodies] एन्डोमायसियल ॲटीबॉडीज आणि ॲन्टीटिश्यू ट्रान्सग्लूटमिनेज ॲटीबॉडी या चाचण्यांद्वारे होतो. सिलीयाक विकार १०० %बरा होणारा नाही. .यावरचा उपाय म्हणजे ग्लूटेन विरहीत आहार. यात प्रत्येक सिलीयाक विकाराच्या रुग्णाची ग्लुटेन सहन होण्याची क्षमता विरहीत आहार. यात प्रत्येक सिलीयाक विकाराच्या रुग्णाची ग्लूटेन सहन होण्याची क्षमता वेगवेगळी असते . काही रुग्णांनी थोड्या प्रमाणात ग्लूटेनयुक्त आहार घेतला ती कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. तर काहिंना थोड्या प्रमाणात ही ग्लूटेनयुक्त आहार घेतल्याने मोठे व अनेक वेळा जुलाब होतात. यावरचा प्रमाणित उपचार म्हणजे आयुष्यभरासाठी ग्लूटेन मुक्त आहार घेणे होय . या बद्दल खालील मार्गदर्शक तत्वे सांगता येतील. ; १. गव्हापासून तयार झालेले , बार्ली , राय यांपासून तयार झालेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत. यात :- पाव, डाळी , बेकरी पदार्थ, बिस्किटे ई. नकोत . २. ओट किंवा ओटपासून तयार झालेले कुठलेही पदार्थ नकोत . ३. बिअर नको . ४. दुध व दुधापासून बनविलेले सर्व पदार्थ या रुग्णांनी वर्ज्य करावे . ५. ज्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात शोषण समस्या आहेत, अशांनी जीवनसत्वे व खनिजे यांची कमतरता भरून येण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या , इंजेक्शन व इतर औषधे वेळेवर घ्यावीत. धन्यवाद ! डॉक्टर प्रीतेश जुनागडे रक्तविकार व कॅन्सर तज्ञ
 2022-02-21T07:58:51

Keywords